मोदी सरकारला न्यायालयाने फटकारले - Marathi News 24taas.com

मोदी सरकारला न्यायालयाने फटकारले

झी २४ तास वेब टीम, अहमदाबाद
 
इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांचे हस्तांतर करण्यास जाणूनबुजून उशीर केल्याबद्दल मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले आहे.
 
इशरत जहॉंप्रकरणी पोलीस महासंचालक पी. पी. पांडे, जी. एल. सिंघल आणि तरुण बारोट या तीन पोलीस अधिकाऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी गृह खात्याने तब्बल दोन महिने लावले. या चकमकीतील दोषी अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेतून हलविण्यात यावे, या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणातील संबंधित साक्षीदारांवर प्रभाव टाकला जाऊ शकतो, अशी सूचना विशेष तपासणी पथकाने केली होती.
 
या प्रकरणाचा तपास सीबीआय'कडे देण्याचा निर्णय न्यायालयाने गुरूवारी  दिला होता. मात्र, याकडेही राज्य सरकारने काणाडोळा केल्याबद्दल न्यायालयाने स्पष्ट नाराजी प्रकट केली. याप्रकरणी पुढील सुनावणी 21 डिसेंबरला होणार आहे.

First Published: Saturday, December 3, 2011, 03:02


comments powered by Disqus