रॉक संगीत ऐकल्यामुळे येतो बहिरेपणा - Marathi News 24taas.com

रॉक संगीत ऐकल्यामुळे येतो बहिरेपणा

www.24taas.com, लंडन
 
जास्त जोरदार संगीत ऐकणं कानांसाठी अपायकारक असतं. नुकत्याच एका संशोधनातून हा दावा करण्यात आला आहे. यासाठी एका संगीत कार्यक्रमात सहभागी झालेल्या किशोरवयीन मुलांचं निरीक्षण करण्यात आलं.
 
रॉक म्युझिक ऐकल्यामुळे ७२% मुलांच्या श्रवणशक्तीवर अनिष्ट परिणाम झाला आणि त्यांची ऐकण्याची क्षमता कमी झाली होती. हाऊस रीसर्च इंस्टिट्यूटचे डॉक्टर एम. जेनेफर डेरेबरी आणि त्यांच्या ग्रुपने रॉक म्युझिकच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या किशोरवयीन मुलांची, ते कार्यक्रमासा जाण्यापूर्वी आणि ते कार्यक्रमाहून आल्यावर चाचणी घेतली. यातून असा निष्कर्ष काढण्यात आला की, कानठळ्या बसणारं रॉक म्युझिक ऐकल्यावर पुढील ४८ तास श्रवणशक्ती कमी होते. असं म्युझिक जर मुलं आय-पॅड, वॉकमन, सीडीमनद्वारे कानामध्ये इयरफोन घालून ऐकत असतील, तर त्यांच्यात कायमस्वरुपी श्रवणदोष निर्माण होऊ शकतो.
 
ऑटोलॉजी अँड न्युरोटोलॉजी या नियतकालिकामध्ये या अभ्यासाबद्दल लिहिण्यात आलं होतं. काही किशोर वयीन मुलांना त्यांच्या आई-वडिलांबरोबर रॉक म्युझिकच्या कार्यक्रमाला बसवण्यात आलं होतं. त्यातील ३ मुलांच्या कानात इयर प्लग घातले होते. कार्यक्रमानंतर ५३.६ % मुलांनी मान्य केलं की त्यांना नीट ऐकू येईनासं झालं आहे. तर २५% मुलांना कानांत काही तरी वाजत असल्याचं वाटत राहिलं. या निरीक्षणावरून निष्कर्ष काढण्यात आलाय, की जास्त रॉक म्युझिक ऐकल्यास कानावर परिणाम होतो.
 

First Published: Thursday, May 24, 2012, 15:52


comments powered by Disqus