Last Updated: Thursday, May 24, 2012, 20:27
www. 24taas.com, मुंबई नितीन गडकरी पुन्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत हा प्रस्ताव मंजूर झालाय. आता हा प्रस्वात अंतिम मंजूरीसाठी राष्ट्रीय परिषदेकडे पाठवण्यात येणार आहे. यामुळं दुस-यांदा भाजप अध्यक्ष होण्याचा गडकरींचा मार्ग मोकळा झाला आहे.
दुस-यांदा गडकरींना अध्यक्ष करण्यासाठी भाजपच्या घटनेत दुरुस्ती करण्यात येणार आहे. घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर झाल्यावर गडकरींच्या अध्यक्षतेखाली भाजप २०१४च्या निवडणुका लढणार हे नक्की झाले आहे.
आज सायंकाळी राजनाथ सिंहांनी गडकरींना पुन्हा अध्यक्षपद देण्यात यावे, असा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला व्यंकय्या नायडूंचं यांनी अनुमोदन दिले. या प्रस्तावाला भाजपच्या सर्व नेत्यांचा एकमुखी पाठिंबा दिला आहे.
First Published: Thursday, May 24, 2012, 20:27