'फेसबूक'वरून 'टीम अण्णा'मध्ये वितुष्ट - Marathi News 24taas.com

'फेसबूक'वरून 'टीम अण्णा'मध्ये वितुष्ट

www.24taas.com, नवी दिल्ली
 
भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारणा-या टीम अण्णांमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट निर्माण झाल्याचं समोर आलंय. टीम अण्णा सदस्य शिवेंद्र सिंह चौहान यांनी अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केलाय.
 
भ्रष्टाचारविरोधातल्या आंदोलनांबाबत फेसबुकवरुन माहिती मिळते असा आरोप त्यांनी केलाय. यासंदर्भात शिवेंद्र यांनी प्रशांत भूषण यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान त्यांनी फेसबुकवरील 'इंडिया अगेन्स्ट करप्शन'च्या पेजबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी केजरीवाल यांना पत्र लिहलं. मात्र या पत्राला केजरीवाल यांनी उत्तर दिलं नसल्याचा आरोप शिवेंद्र सिंह यांनी केलाय.
 
दुसरीकडे शिवेंद्र यांचा लोकशाही कार्यपद्धतीवर विश्वास नसल्यामुळं ते अशाप्रकारचे आरोप करत असल्याचा पलटवार केजरीवाल यांनी केलाय. शिवेंद्र यांनी कोर कमिटीचं ऐकलं नाहीतर त्यांना आंदोलनातून हटवण्यात येईल असा इशारा केजरीवाल यांनी दिलाय....

First Published: Friday, May 25, 2012, 14:16


comments powered by Disqus