Last Updated: Saturday, December 3, 2011, 15:20
झी 24 तास वेब टीम, जबलपूरजबलपूरमध्ये आयसीएआरच्या एका कार्यक्रमात पवारांच्या शेजारी सिलिंग फॅन कोसळला.यात शरद पवार थोडक्यात बचावले. भारतीय कृषी संशोधन परिषदेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शरद पवार जनतेला संबोधित करत असताना हा प्रकार घडला.
सिलिंग फॅन व्यवस्थित बसवला नसल्याने तो पवारांपासून ४ ते ५ फुटांच्या अंतरावर कोसळला, असं जबलपूरच्या पोलिसांचं म्हणणं आहे.
परंतु, हे घडल्यावरदेखील शरद पवारांनी आपलं भाषण न थांबवता ते पूर्ण केलं.
First Published: Saturday, December 3, 2011, 15:20