Last Updated: Saturday, May 26, 2012, 10:28
www.24taas.com, मानपूर कोहका गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या छत्तीसगडच्या मानपूर कोहका मार्गावर नक्षल्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. यात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेला भूसुरुंगांचा समावेश आहे.
हा भूसुरुंग सुरक्षा दलांनी निकामी केलाय. तसंच या परिसरातून रॉकेट लॉन्चरचा साठा शोधून काढलाय. या कारवाईमुळे आंतरराज्यीय महामार्गावर घातपात घडवून आणण्याचा नक्षल्यांचा कट उधळून लावलाय.
छत्तीसगड जिल्ह्यातील मानपूर तालुक्यातल्या सीता गावात आयटीबीपी आणि छत्तीसगड पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय़.
First Published: Saturday, May 26, 2012, 10:28