Last Updated: Saturday, May 26, 2012, 15:15
www.24taas.com, नवी दिल्ली टीम अण्णांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत युपीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. केंद्रातले १५ मंत्री भ्रष्टाचारी असून त्यांची त्वरित चौकशी करण्याची मागणी टीम अण्णांनी एका पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.
विशेष म्हणजे टीम अण्णांनी पंतप्रधानांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. पंतप्रधानांवर कोळसा घोटाळ्याचा आरोप केला गेला आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम, प्रणव मुखर्जी, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, कमलनाथ, सलमान खुर्शीद यांची नावं 15 जणांच्या यादीत आहेत.
या सर्वांची 3 न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी टीम अण्णांनी केलीय. त्याकरता टीम अण्णांनी सरकारला 24 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिलाय आपली मागणी मान्य न झाल्यास 25 जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा टीम अण्णांनी दिलाय.
First Published: Saturday, May 26, 2012, 15:15