मध्य प्रदेशात लाईव्ह एन्टाऊंटर - Marathi News 24taas.com

मध्य प्रदेशात लाईव्ह एन्टाऊंटर

www.24taas.com, भोपाळ
 
मध्य प्रदेशात लाईव्ह एन्टाऊंटर नाट्य घडलं. त्याचं असं झालं की, दरोडेखोरांनी लूट करताना तीन लाख पळविले. मात्र, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घेराव घातला. पोलिसांना शरण येण्याऐवजी लुटारूंनी गोळीबार केला आणि चकमक झाली.
 
मध्यप्रदेशातल्या एका गावात तीन दरोडेखोरांनी एका ठिकाणी तीन लाख रुपयांची लूट केली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच दरोडेखोरांनी पैसे घेऊन तिथून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, दरोडेखोर एका घरात लपले होते. त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी पोलिसांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. त्याला प्रत्युत्त म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला.
 
पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये तब्बल पाच तास एन्काऊंटर सुरू होतं. त्यामध्ये एक दरोडेखोर ठार झाला. तर दोन पोलीसही जखमी झाले.

First Published: Saturday, May 26, 2012, 19:47


comments powered by Disqus