रिटेलवर ममतांना किरकोळ अश्वासन - Marathi News 24taas.com

रिटेलवर ममतांना किरकोळ अश्वासन

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
रिटेल क्षेत्रात FDI चा निर्णय सहमती होईपर्यंत लागु होणार नाही असं आश्वासन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिल्याचा दावा तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केलीय.
 
प्रणव मुखर्जी यांनी फोन केल्याचं ममतांनी सांगितलं. रिटेलमधल्या FDI च्या मुद्द्यावर काँग्रेसला द्रमुक आणि तृणमुलचा विरोध आहे. त्यामुळं सरकारची कोंडी झालीय. ही कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारचे संकटमोचक असलेल्या मुखर्जींनी ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. सरकार मित्रपक्षांशी चर्चा करेल मगच अंमलबजावणी केली जाईल असं मुखर्जींनी म्हटल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटलंय.

First Published: Saturday, December 3, 2011, 16:33


comments powered by Disqus