अण्णांनी दिली पंतप्रधांना क्लीन चिट - Marathi News 24taas.com

अण्णांनी दिली पंतप्रधांना क्लीन चिट

www.24taas.com, नवी दिल्‍ली
 
पंतप्रधानांवरील आरोपांवरून टीम अण्णांमधले मतभेद उघड झाले आहेत. टीम अण्णांनी कोळसा घोटाळ्य़ावरून पंतप्रधानांना टार्गेट केलंय. तर अण्णांनी मात्र पंतप्रधांना क्लीन चिट दिली आहे.
 
पंतप्रधान मनमोहन सिंग आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे भ्रष्ट नसल्याचं सर्टिफिकेट दिले आहे. विशेष म्हणजे टीम अण्णांच्या सदस्यांनी आज दुपारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबतही आपल्याला माहिती नसल्याचंही अण्णांनी सांगितलंय.
 
तत्पूर्वी टीम अण्णांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत युपीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. केंद्रातले 15 मंत्री भ्रष्टाचारी असून त्यांची त्वरित चौकशी करण्याची मागणी टीम अण्णांनी एका पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केलीय. विशेष म्हणजे टीम अण्णांनी पंतप्रधानांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. याशिवाय केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम, प्रणव मुखर्जी, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, कमलनाथ, सलमान खुर्शीद यांची नावं 15 जणांच्या यादीत आहेत.
 
या सर्वांची तीन न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी टीम अण्णांनी केलीय. त्याकरता टीम अण्णांनी सरकारला २४ जुलैपर्यंत अल्टिमेटम दिलाय. आपली मागणी मान्य न झाल्यास 25 जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा टीम अण्णांनी दिलाय.
 
कोण आहेत भ्रष्टमंत्री
 
टीम  अण्णांनी आरोप केलेले भ्रष्टमंत्री
 

First Published: Saturday, May 26, 2012, 22:02


comments powered by Disqus