जगनमोहन रेड्डींना अटक - Marathi News 24taas.com

जगनमोहन रेड्डींना अटक

www.24taas.com, हैदराबाद
 
वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांना सीबीआयनं अटक केलीय. बेहिशेबी संपत्ती प्रकरणी खटल्यात जगनमोहन रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
 
जगनमोहन यांची सीबीआयनं तीन दिवस कसून चौकशी केली. त्यानंतर आज सायंकाळी साडे सातच्या सुमारास रेड्डी यांना अटक केली गेली. जगनमोहन यांच्या अटकेनंतर त्यांच्या अनुपस्थितीत विजयअम्मा या वायएसआरची धुरा सांभाळणार आहेत, असं वायएसआर काँग्रेसचे प्रवक्ता अम्बाती रामबाबू यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, जगनमोहन यांच्या अटकेनंतर हैदराबादमधली सुरक्षा वाढवण्यात आलीय.

First Published: Sunday, May 27, 2012, 20:33


comments powered by Disqus