Last Updated: Wednesday, June 20, 2012, 08:26
www.24taas.com, लखनऊ
उत्तर प्रदेश विधानसभेत सोमवारी सकाळी राज्यपालांचे भाषण सुरु असताना विरोधी पक्ष बहुजन समाज पक्ष (बसप) आणि सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या (सप) आमदारांनी जोरदार गोंधळ घातला.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याने बसपच्या आमदारांनी राज्यपाल बी. एल. जोशी यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस या गोंधळामुळे गाजला. काही आमदारांनी बाकावर चढून बॅनर्स दाखवत घोषणाबाजी केली. बसपच्या आमदारांकडून समाजवादी पक्षाचे सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात येत होती. यावेळी सभागृहात मुख्यमंत्री अखिलेश यादव हे उपस्थित होते. या गोंधळामुळे राज्यपालांनी आपले भाषण उरकत कामकाज तहकूब केले.
First Published: Wednesday, June 20, 2012, 08:26