Last Updated: Monday, May 28, 2012, 22:12
www.24taas.com, आंध्रप्रदेश आंध्रप्रदेश हायकोर्टाने ओबीसींच्या कोट्यातून अल्पसंख्याकांना साडेचार टक्के आरक्षण देण्यास नकार दिलाय. राज्य सरकारचा हा निर्णय घटनात्मक नसल्याचं हायकोर्टानं म्हटलंय.
राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जातोय. या ओबीसी कोट्यातून मुस्लिमांना मिळणाऱ्या आरक्षणाविरोधातल्या जनहित याचिकेवर सुनावणी करतांना हायकोर्टाने हे सांगितलय. तसचं हा केवळ धर्माच्या आधारावर घेतला गेलेला निर्णय आहे, अन्य कसलाही आधार या निर्णयाला नसल्याचं कोर्टानं यावेळी नमूद केलंय.
First Published: Monday, May 28, 2012, 22:12