मी बोललोच नाही, करूणानिधींची कोलांटउडी - Marathi News 24taas.com

मी बोललोच नाही, करूणानिधींची कोलांटउडी

www.24taas.com, चेन्नई
 
युपीए सरकारचा पाठिंबा काढण्याची धमकी दिलीच नव्हती असा यूटर्न डीएमकेचे सर्वेसर्वा एम.करुणानिधी यांनी मारला आहे. मी असं बोललोच नव्हतो.. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. अशी करूणानिधी यांनी पलटी मारली आहे.
 
पेट्रोल दरवाढीच्या मुद्यावरुन सकाळीच करुणानिधी यांनी सरकारला इशारा दिला होता. सामान्यांच्या विरोधातली धोरणं बंद झाली नाही तर सरकारमध्ये राहणार नाही असं करुणानिधी यांनी म्हटलं होतं. शिवाय या दरवाढीविरोधात डीएमकेनं रस्त्यावर उतरुन आंदोलनही सुरु केलं होतं.
 
मात्र त्यांच्या वक्तव्यानंतर प्रसिद्धीमाध्यांमानी दाखविलेल्या बातमीनंतर करूणानिधी यांनी सोयीस्कररित्या पलटी मारली आहे. त्यामुळे सरकारने मात्र सुटकेचा निश्वास सोडला असणार.
 
 
 
 

First Published: Wednesday, May 30, 2012, 14:39


comments powered by Disqus