मी पंतप्रधान आहे तेच बरयं- मनमोहन - Marathi News 24taas.com

मी पंतप्रधान आहे तेच बरयं- मनमोहन

 www.24taas.com, नवी दिल्ली
 
पंतप्रधान मनमोहन सिंग युपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील ही अटकळ खुद्द पंतप्रधानांनीच फेटाळून लावली आहे. जिथं आहे तिथं मी खूष आहे असं सांगत त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
 
पंतप्रधान मनमोहन सिंग यांची ७ रेसकोर्स सोडून राष्ट्रपती भवनात जाण्याची इच्छा नाही. राष्ट्रपतिपदासाठी युपीएनं अद्याप कोणत्याही नावाची घोषणा केली नसली तरी मीरा कुमार यांच्यापासून हमीद अन्सारीपर्यंत आणि प्रणव मुखर्जींपासून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यापर्यंत अनेक नावांची चर्चा सध्या सुरु आहे. म्यानमार दौऱ्यावरून परतताना विमानात पंतप्रधानांना जेव्हा याबाबत विचारलं गेलं तेव्हा पंतप्रधानपदावर समाधानी असल्याचं उत्तर त्यांनी दिलं.
 
पंतप्रधान नेहमी मौन का बाळगतात ? या सर्वांनाच पडणा-या प्रश्नाचं गूढही त्यांनी अशा शब्दांत उघड केलं. राष्ट्रपतीपदाबाबत पंतप्रधानांनी तर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता युपीए आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींच्या कोर्टात चेंडू आहे. ज्यांना राष्ट्रपतिपदाच्या दावेदाराबरोबरच त्याचा उत्तराधिकारीही निश्चित करायचा आहे.
 
 
 
 
 

First Published: Wednesday, May 30, 2012, 15:40


comments powered by Disqus