Last Updated: Thursday, May 31, 2012, 15:01
www.24taas.com, जौनपूर वड्याहून डेहराडूनला जाणा-या डून एक्सप्रेसला उत्तर प्रदेशात जौनपूर येथे अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी ठार झालेत तर ५० जण जखमी झालेत. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. डून एक्सप्रेसला दुपारी सव्वा एकच्या सुमारास अपघात झाला.
डून एक्सप्रेसचे सात डबे रेल्वे मार्गावरून घसरल्यामुळे हा अपघात झाला. एस-4 ते एस-9 पर्यंतचे सर्व डबे रेल्वे मार्गावरून घसरले. अपघातानंतर लगेचच रेल्वेचे अधिकारी आणि डॉक्टरांची एक टीम घटनास्थळी रवाना झाली.
स्थानिक पोलीस आणि रेल्वे प्रवाशांकडून मदतकार्य सुरू आहे. डब्यात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात येत आहे. दोन एसी डबेही घसरल्याचे एका प्रत्यशदर्शीने सांगितले. रेल्वे अधिका-यांनी चार जण ठार झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. आतापर्यंत सात जणांचे मृतदेश बाहेर काढण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील महराना स्टेशनपासून सुमारे आठ किलोमीटरवर हा अपघात झाल्याची माहिती रेल्वेचे अधिकारी गुरूदर्शन सिंह यांनी दिली.
First Published: Thursday, May 31, 2012, 15:01