'रोमिंग चार्जेस'पासून सुटका... - Marathi News 24taas.com

'रोमिंग चार्जेस'पासून सुटका...

 www.24taas.com, नवी दिल्ली
 
देशातल्या तमाम मोबाईलधारसाठी एक खुषखबर... आता, तुम्ही देशभरात कुठेही असाल तरी तुम्हाला मोबाईलसाठी रोमिंग चार्जेस द्यायची गरज लागणार नाही.
 
आजच्या कॅबिनेट बैठकीत नॅशनल टेलिकॉम पॉलीसीला मंजूरी देण्यात आलीय. देशभरातून रोमिंग चार्जेस रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. ग्राहकांना आपल्या सर्कलबाहेर असतानाही कोणत्याही प्रकारचे चार्जेस द्यावे लागू नयेत तसंच त्यांना रोमिंग फ्री मुक्तसंचार करता यावा, अशा सुचना या पॉलिसीत करण्यात आल्यात. त्यामुळे रोमिंग चार्जेस, सर्कलच्या बाहेर येणारे फोन आणि केले जाणारे कॉल्स करताना रोमिंग चार्जेसपासून ग्राहकांना सुटकारा मिळाला आहे. त्याचप्रमाणे देशबाहेरही मोबाईलधारकाचा तोच नंबर वापरात राहणारय. त्यात हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

First Published: Thursday, May 31, 2012, 15:40


comments powered by Disqus