चोरीची खबर दिल्याने नालासोपाऱ्यात गोळीबार - Marathi News 24taas.com

चोरीची खबर दिल्याने नालासोपाऱ्यात गोळीबार

www.24taas.com,मुंबई
 
नालासोपा-यात बुधवारी रात्री फायरिंगची घटना घडली.पोलिसांना चोरीची खबर दिल्याच्या कारणावरून राग मनात धरून हा गोळीबार करण्यात आला.
 
जावेद इंद्रेश शेख या पोलिसांच्या खब-यानं दोन महिन्यांपूर्वी शम्मो आणि मंट्टो या दोघांना एका चोरीच्या गुन्ह्यात बोरीवली पोलिसांना पकडून दिलं होते. याचाच राग मनात धरून शम्मो आणि मंट्टो या दोघांनी आपल्या पाच साथिदारांच्या मदतीनं जावेद सेख याच्या घरात घुसले आणि दमदाटी केली.
 
हे पाचही एवढ्यावर न थांबता त्यांनी जावेद शेख याच्या डोक्यावर बिअरच्या बाटल्या फोडल्या आणि हवेत दोन राऊंड फायर करून बंदूक तिथेच टाकून ते फरार झाले.या प्रकरणी अद्याप कोणालीही अटक  झाली नसून पोलिसांचा तपास सुरू आहे.

First Published: Friday, June 1, 2012, 07:57


comments powered by Disqus