मोदींनी घेतली वाजपेयी, अडवाणींची भेट - Marathi News 24taas.com

मोदींनी घेतली वाजपेयी, अडवाणींची भेट

www.24taas.com, नवी दिल्ली
 
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. वाजपेयींच्या भेटीनंतर मोदी लालकृष्ण अडवाणींच्या भेटीला पोचले. मोदींनी अडवाणींची घेतलेली भेट ही पॅचअपची प्रक्रिया मानली जातेय.
 
अडवाणींनी केलेल्या टीकेनंतर पक्षातली दुफळी स्पष्ट झाली होती. त्यामुळं आता डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झालेत. भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनीही नुकतीच अडवाणींची भेट घेतली होती, त्यानंतर नरेंद्र मोदीही अडवाणींच्या भेटीला पोहचल्यानं, भाजपात वरिष्ठ पातळीवरुन ब्लॉगचे पडसाद उमटत असल्याचं स्पष्ट झालय.
 
संबंधित  आणखी बातमी
 
भाजपच्या मुखपत्रात नरेंद्र मोदींवरच टीका

भाजपच्या मुखपत्रात नरेंद्र मोदींवरच टीका
भाजपमधील आंतरकलह अजूनही संपण्याचे नावच घेत नाही. पार्टीचे वरीष्ठ नेता लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमधून नितीन गडकरींवर ताशेरे ओढल्यानंतर आता भाजपचं मुखपत्र असलेल्या ‘कमल संदेश’मधून नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करण्यात आला आहे. मुखपत्रात कुणाचंही नाव न पार्टीतल्या काही नेत्यांना मोठं होण्याची घाई झालेली आहे, असं लिहिण्यात आलं आहे.


------------------------------------------------------

मोदींविरोधात मोर्चेबांधणीला जोर…

मोदींविरोधात मोर्चेबांधणीला जोर…
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांच्यासह दहा वरिष्ठ नेत्यांनी मोदींच्या विरोधात रणनिती आखण्यासाठी बैठक बोलावली आहे.


First Published: Saturday, June 2, 2012, 11:05


comments powered by Disqus