दिल्लीत आमदारावर प्राणघातक हल्ला - Marathi News 24taas.com

दिल्लीत आमदारावर प्राणघातक हल्ला

www.24taas.com, नवी दिल्ली
 
दिल्लीच्या नजफगडाच्या अपक्ष आमदार भरत सिंह यांच्यावर ४-५  अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्यासह त्यांचा एक नातेवाईकही गंभीर जखमी झाला असून त्या दोघांना एका खासगी हॉस्पिटलमधअये दाखल करण्यात आले आहे.
 
भरत सिंह यांच्या कार्यालयाबाहेरच त्यांच्यावर अज्ञातांनी हा हल्ला केलाय. मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्तांची तातडीनं बैठक बोलावलीय़. तर दिल्लीत आमदारच सुरक्षित नाहीत तर जनता तरी कशी सुरक्षित राहील अशी टीका भाजपनं केलीय.
 
अपक्ष आमदार भरत सिंह हे आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्यावर हा हल्ला का झाला आणि कुणी केला याबाबत पोलीस अधिक तपास करताहेत.

First Published: Saturday, June 2, 2012, 12:06


comments powered by Disqus