टीम अण्णा- रामदेव बाबा यांच्यात वाद - Marathi News 24taas.com

टीम अण्णा- रामदेव बाबा यांच्यात वाद

www.24taas.com, नवी दिल्ली
 
बाबा रामदेव यांच्या लाक्षणिक उपोषणा दरम्यान बाबा आणि  अरविंद केजरीवाल यांच्यातले मतभेद उघड झाले. आपल्या भाषणात केजरीवाल यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं.
 
केजरीवाल यांचे भाषण संपताच रामदेव बाबांनी माईक हातात घेऊन वैयक्तिक टीका टिप्पणी करु नये अशी आमची अपेक्षा होती मात्र केजरीवाल यांनी नावं घेतल्यानं वाद होऊ शकतो असं रामदेव बाबा म्हणाले.
 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात अखेरपर्यंत लढाईचा निर्धार व्यक्त केला. जंतरमंतरवर योगगुरु बाबा रामदेव यांनी लाक्षणिक उपोषण केलं. त्यावेळी अण्णांनी देशात बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला.
 
 
 
 

First Published: Sunday, June 3, 2012, 18:25


comments powered by Disqus