पंतप्रधानांवरचे आरोप तथ्यहीन- सोनिया गांधी - Marathi News 24taas.com

पंतप्रधानांवरचे आरोप तथ्यहीन- सोनिया गांधी

www.24taas.com, नवी दिल्ली
 
दिल्लीत आज झालेल्या काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अध्यक्षा सोनिया गांधींनी टीम अण्णा आणि विरोधकांवर पलटवार केला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पाठराखण करत सरकार आणि काँग्रेसवरील आरोप तथ्यहीन असल्याचा दावा सोनियांनी केला.
 
पंतप्रधनांवर झालेली टीका हे विरोधकांचं षडयंत्र असल्याचा आरोप सोनिया गांधींनी केलाय. या वेळी सोनियांच्या टीकेतून काँग्रेस नेत्यांचीही सुटका झाली नाही. गटबाजी करणा-यापेक्षा पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश सोनिया गांधींनी काँग्रेस नेत्यांना या बैठकीत दिले. गैरवर्तवणूक कुठल्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नसल्याचा इशाराही सोनियांनी कार्यकर्त्यांना दिला.
 
2014 च्या निवडणुकासांठी तयार राहण्य़ाच्या सूचनाही नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आल्या. या बैठकीला पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधीही उपस्थित होते.

First Published: Monday, June 4, 2012, 13:48


comments powered by Disqus