सोनिया गांधी सांगणार तेच राष्ट्रपती - Marathi News 24taas.com

सोनिया गांधी सांगणार तेच राष्ट्रपती

www.24taas.com, नवी दिल्ली
 
राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्यात आलेत. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
 
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सोनियांना सर्वाधिकार देण्याचा प्रस्ताव दिला. दिल्लीत आज झालेल्या काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अध्यक्षा सोनिया गांधींनी टीम अण्णा आणि विरोधकांवर पलटवार केला.  पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पाठराखण करत सरकार आणि काँग्रेसवरील आरोप तथ्यहीन असल्याचा दावा सोनियांनी केला आहे.
 
तसेच हे विरोधकांचं षडयंत्र असल्याचा आरोप सोनिया गांधींनी केलाय. तर सोनियांच्या टीकेतून काँग्रेस नेत्यांचीही सुटका झाली नाही. गटबाजी करणा-यापेक्षा पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश सोनिया गांधींनी काँग्रेस नेत्यांना या बैठकीत दिले.

First Published: Monday, June 4, 2012, 19:59


comments powered by Disqus