Last Updated: Monday, June 4, 2012, 22:19
www.24taas.com, नवी दिल्ली काळ्या पैशासाठी आंदोलन छेडणाऱ्या आणि भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देणाऱ्या य़ोगगुरु रामदेव बाबा यांच्या ट्रस्टला सेवा कर चुकवल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे रामदेव बाबा अडचणीत सापण्याची शक्यता आहे.
सुमारे पाच कोटी रुपयांचा सेवाकर चुकवल्याप्रकरणी सर्विस टॅक्स विभागानं ही नोटीस बजावलीय. त्यामुळं काळ्य़ा पैशांविरोधात आंदोलन छेडलेल्या बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांच्या मुद्यावरुन बाबा रामदेव यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेतली. बाबा रामदेव यांनी यावेळी आपल्या आंदोलनाला भाजपक़डून पाठिंबा मागितला. गडकरी यांनी भाजपचा पाठिंबा असल्याचं पत्र यावेळी सुपूर्द केलं. गडकरी यांनी पाया पडून आणि गळाभेट घेऊन बाबांच स्वागत केलं. बाबा रामदेव इतरही नेत्यांच्या गाठीभेटी यानंतर घेणार आहेत.
First Published: Monday, June 4, 2012, 22:19