कानडी द्वेष, मराठी शाळांना अनुदान नाही - Marathi News 24taas.com

कानडी द्वेष, मराठी शाळांना अनुदान नाही

www.24taas.com, बंगळुरू
 
कानडी सरकारचा मराठी द्वेष पुन्हा एकदा समोर आला आहे. मराठी शाळांना अनुदान देणं कर्नाटक सरकारनं बंद केलं आहे. प्राथमिक शाळांना इमारत आणि इतर शैक्षणिक साहित्य पुरवण्याची जबाबदारी सरकारची असते.
 
असं असतानाही बेळगावातल्या मराठी प्राथमिक शाळा आणि विद्यार्थ्यांची सरकारकडून अवहेलना होत असल्याचं पाहायला मिळते आहे. इथं शाळेला इमारतच नसल्यानं विद्यार्थ्यांना चक्क रस्त्यावर बसून शिक्षण घ्यावं लागतं आहे. शिवाय शैक्षणिक साहित्यदेखील या विद्यार्थ्यांना मिळत नाही.
 
मराठी शाळेतील विद्यार्थी रस्त्यावर आल्याचे कळताच मराठी युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालून याचा जाब विचारला. यावेळी कर्नाटक सरकारला निषेध करत मराठी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन या कार्यकर्त्यांनी दिलं आहे.
 
 
 

First Published: Tuesday, June 5, 2012, 10:48


comments powered by Disqus