प. बंगालमध्ये तृणमूलला तीन जागा - Marathi News 24taas.com

प. बंगालमध्ये तृणमूलला तीन जागा

 www.24taas.com, कोलकाता
 
पश्चिम बंगालमध्ये रविवारी सहा जागांसाठी झालेल्या स्थानिक निवडणुकीत  तृणमूल कांग्रेसने तीन जागांवर विजय मिळविला आहे. तर एक जागा काँग्रेसकडे गेली आहे.
पश्चिम बंगाल गेल्या रविवारी सहा जागांसाठी मतदान झाले होते.  मुख्यमंत्री ममता बनर्जी यांचे सरकार पश्चिम बंगालमध्ये सरकार असल्याने या निवडणुकीकडे लक्ष लागले होते.  बर्दवान जिल्ह्यीतील  दुर्गापूर, पूर्वी मिदनापूरमध्ये  पंसकुरा तथा हल्दिया, जलपाईगुडीतील धूपगुड़ी तर नाडियातील कूपर्स कॅम्प आणि बीरभूम जिल्ह्यातील नालहाटी या जागांसाठी निवडणूक झाली होती.
 
तृणमूल काँग्रेस आणि  काँग्रेस यांच्यातील भांडणामुळे येथील युती तुटली होती. दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती.  दरम्यान केंद्रात तृणमूल काँग्रेस हा काँग्रेसचा घटक पक्ष आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती.

First Published: Tuesday, June 5, 2012, 12:08


comments powered by Disqus