डिंपल निवडणूक रिंगणात - Marathi News 24taas.com

डिंपल निवडणूक रिंगणात

www.24taas.com, लखनऊ
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव या कन्नौज लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवित आहेत. आज त्यांनी उमेवारीचा अर्ज  भरला.
 
अखिलेश यादव हे याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. उत्तर प्रदेशच्‍या मुख्‍यमंत्रीपदाची सुत्रे हातात घेतल्‍यानंतर त्‍यांनी लोकसभा सदस्‍यत्त्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर समाजवादी पार्टीने त्‍यांना उमेदवारी देण्‍याचा निर्णय घेतला आहे.
 
कन्नौज लोकसभा  मतदार संघाची २४ जूनला पोटनिवडणूक होत आहे. अखिलेश यादव यांनी २००९ मध्‍ये फिरोजाबाद आणि कन्नौज या दोन मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. परंतु, फिरोजाबाद येथील जागा त्‍यांनी सोडली. त्‍यानंतर त्‍याठिकाणी झालेल्‍या पोटनिवडणुकीत डिंपल यांना सपाने उमेदवारी दिली होती. परंतु, त्‍यांचा राज बब्‍बर यांनी पराभव केला होता.

First Published: Tuesday, June 5, 2012, 15:34


comments powered by Disqus