मुस्लिम मुलींना अल्पवयात लग्नाचा अधिकार - Marathi News 24taas.com

मुस्लिम मुलींना अल्पवयात लग्नाचा अधिकार

www.24taas.com, नवी दिल्ली
 
मुस्लीम मुलीने  वयाची १५ वर्षे ओलांडल्यानंतर लग्न करू शकते, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायाधीश एस. रवींद्र भट आणि एस.पी. गर्ग यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. मुलगी वयात आल्यानंतर तिने लग्न केले तर ते बेकायदा ठरवता येत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
 
खरंतर, भारतीय कायद्यानुसार लग्नाच्या वेळी मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ असणे अपेक्षित आहे.मात्र, मुस्लिम मुलींची या कायद्यातून सुटका केली आहे. खंडपीठाच्या म्हणण्यानुसार इस्लामी कायद्यानुसार कोणतीही मुस्लीम मुलगी वयात आल्यानंतर पालकांच्या मनाविरुद्ध लग्न करू शकते. संबंधित मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल तरीही ती तिच्या नव-यासोबत राहू शकते.
 
एका १६ वर्षाच्या मुलीने पतीसोबत राहण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. मुलीच्या आईने आरोप केला होता की तिच्या मुलीचे मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात अपहरण झाले होते. मात्र, मुलीने आपण आपल्या मर्जीने आपल्या आवडत्या मुलाशी लग्न करण्यासाठी आई-वडिलांचे घर सोडले आहे, असं मान्य केल्यानंतर तिच्या नवऱ्यावरील अपहरणाचा खटला मागे घेतला गेला.

First Published: Wednesday, June 6, 2012, 08:33


comments powered by Disqus