पवारांची 'नवी खेळी', बाबांची आठवण 'आयत्या वेळी' - Marathi News 24taas.com

पवारांची 'नवी खेळी', बाबांची आठवण 'आयत्या वेळी'

www.24taas.com, नवी दिल्ली
 
काळ्या पैशाच्या मुद्द्यावर बाबा रामदेव यांच्या अभियानाचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार त्यांची भेट घेतली.  काळ्या पैशाच्या मुद्द्यावर योगगुरू बाबा रामदेव यांनी निवडलेला मार्ग योग्य आहे. शरद पवार आणि बाबा रामदेव यांनी एकमेकांशी जवळजवळ अर्धा तास गप्पा मारल्या. यादरम्यान या दोघांनी काळ्या पैशाच्या मुद्यावर चर्चा केली.
 
पवारांनी रामदेव बाबांच्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना रामदेव यांच्या या आंदोलनबाबत चर्चा केली, तसेच काळ्या पैशासंबंधी नवा कायदा बनविण्यात येईल, ज्यात व्यक्ती आपली संपत्ती लपवू शकत नाही अशी तरतूद करण्यात येईल, असे पवार म्हणाले.
 
या प्रकारे काळ्या पैश्याचा मुद्यावर रामदेव बाबांच्या भेटीला पवार गेल्याने राजकिय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे पवारांनी स्पष्ट केलं की, त्यांना बाबांच्या या आंदोलनात कोणतंही राज कारण  असल्याचं दिसून येत नाही.
 
 
 

First Published: Wednesday, June 6, 2012, 11:45


comments powered by Disqus