Last Updated: Friday, June 8, 2012, 10:45
www.24taas.com, नवी दिल्ली 
देशाच्या अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या प्रणव मुखर्जींना रोजच्या कामातून वेळ मिळणं तसं कठिणच. अशातही आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत त्यांनी 'झी न्यूज'च्या स्टुडिओला भेट दिली. कधी सरकारसमोरील अडचणी. तर कधी सत्ता स्थापनेसाठी धावपळ.
प्रणव मुखर्जींना यातून वेळ मिळणं अशक्यच. पण अशातही वेळात वेळ काढून 'प्रणव'दा 'झी न्यूज'च्या स्टुडिओत पोहचले. पत्नी शुभ्रा मुखर्जीसह ते इथं आले ते संगीताच्या ओढीनं. कुमार सानु यांच्या तेरे बिनका अल्बमच्या रिलीजसाठी प्रणवदा 'झी न्यूज'च्या स्टुडिओत आले होते. त्यांच इथं येणचं मुळी कुमार सानु आणि त्यांच्या सहकार्यासाठी सरप्राईज होतं.
प्रणवदांनही बहुधा याची कल्पना नसावी की एक सरप्राईज त्यांच्यासाठीही होतं. शुभ्रा यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. आणि त्यांच्या आवाजाचे सर्वाधिक चाहते आहेत खुद्द प्रणव मुखर्जी. कुमार सानूनही आपल्या गाण्यानं मैफलीत रंग भरले. आणि दुर्गा पुजेपर्यंत बांग्ला भाषेत हा अल्बम तयार करण्याचं आश्वासनही देऊन टाकलं. सुरांच्या या मैफलिचा प्रणवदांनी पुरेपुर आनंद घेतला.
First Published: Friday, June 8, 2012, 10:45