जेलमध्ये कैद्यांना सेक्सची परवानगी ? - Marathi News 24taas.com

जेलमध्ये कैद्यांना सेक्सची परवानगी ?

 www.24taas.com, चंदिगढ
 
लवकरच पंजाब हे असं पहिलं राज्य असेल कि जिथे जेलमधल्या कैदींना सेक्स करण्याची सुविधा मिळणाची शक्यता आहे. ुपंजाबचे डीजीपी (जेल) शशिकांत यांनी यासंबंधी राज्य सरकारला एक प्रस्ताव पाठवला आहे. जर का हा प्रस्ताव मान्य करण्यात आला तर पंजाबच्या जेलमधील कैद्यांना आपल्या पार्टनरसोबत सेक्स करण्याची मुभा मिळू शकते.
 
शशिकांत यांनी पाठवलेल्या प्रस्तावात असं म्हटलं आहे की, काही कैद्यांना जेलमध्ये आपल्या पार्टनर सोबत सेक्स करण्याची परवानगी मिळाली पाहिजे. कैदी या सुविधेसाठी आवदेन करतील आणि त्यांची पुर्ण चाचणी केली जाईल. तसेच त्यांच्या चारित्र्याबद्दल , जेलमधील त्याचं वागणं आणि शिक्षेच्या अवधीचा विचार करण्यात येईल. तसेच ं ज्याचं लग्न झालेलं आहे. त्यानांच सेक्स करण्याची परवानगी दिली जाईल.
 
कैद्यांना सेक्स करण्यासाठी एका विशेष जागेची तरतूद करण्यात येणार आहे. कारण की त्यांना एकांत मिळणं हे देखील महत्त्वाचं आहे. सेक्स मानवाची मुलभूत शारीरिक गरज आहे. त्यामुळे जेल अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारसमोर ठेवला आहे.
 
 
 

First Published: Friday, June 8, 2012, 11:21


comments powered by Disqus