'नरेंद्र मोदी पक्षापेक्षा मोठे नाहीत' - Marathi News 24taas.com

'नरेंद्र मोदी पक्षापेक्षा मोठे नाहीत'

www.24taas.com, नागपूर
 
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसाठी, पक्षाच्या कार्यकारिणीतून संजय जोशींना राजीनामा द्यायला लावणे, ही चूक होती, अशा शब्दात  संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी भाजप आणि मोदींवर शरसंधान केलं. कोणताही नेता पक्षापेक्षा मोठा नसल्याचं सांगतानाच, अडवाणींनी ब्लॉगमधून व्यक्त केलेल्या नाराजीवरही त्यांनी मतप्रदर्शन केलय.
 
मुंबईत पार पडलेली भाजपची कार्यकारिणी गाजली ती अंतर्गत मतभेदांनी.. संजय जोशी यांना पक्षाच्या कार्यकारिणीचा राजीनामा दिल्यानंतरच नरेंद्र मोदी या कार्यकारिणीत सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले.. संजय जोशींसारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला देण्यात आलेली ही वागणूक संघातल्या अनेक मात्तबर आणि जुन्या जाणत्या नेत्यांना रुचलेली नाही..
 
या प्रकरणावर पहिल्यांदाच जाहीर भाष्य करत संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी मोदी आणि भाजपवर प्रहार केलाय. कोणताही नेता हा पक्षापेक्षा मोठा नसल्याचं सांगत, भाजप हा पार्टी विथ डिफरन्स अशी इमेज घेऊन चालणारा पक्ष असल्याची जाणीव त्यांनी करुन दिली.
 
 
 

First Published: Friday, June 8, 2012, 14:02


comments powered by Disqus