Last Updated: Saturday, June 9, 2012, 13:51
www.24taas.com,कोलकाता पेट्रोलचे दर कमी होण्याची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर उतरल्याने होणार पेट्रोलचे दर कमी होण्याचे संकेत प्रणव मुखर्जी यांनी दिले आहेत.
देशात पेट्रोलची प्रतिलिटर साडे सात रुपयांनी दरवाढ झाल्यानंतर, युपीए सरकारविरोधात संतापाचा भ़डका उडाला होता. त्यानंतर तेल कंपन्यांनी पेट्रोलमध्ये दोन रुपयांची दरकपात केली होती. तरीही साडे पाच रुपयांनी पेट्रोल महागल्यानं सर्वसामान्य जनता हैराण आहे. कच्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोलच्या किमती अजून कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने देशातल्या पेट्रोलच्या किमतीही कमी होतील, अशी शक्यता प्रणवदांनी व्यक्त केली आहे. यामुळेच सरकारकडून पेट्रोलमध्ये दरकपातीची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. प्रणव आणि ममता बॅनर्जी यांच्यात चर्चा झाली. पेट्रोल दरवाढीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये भडका वाढला होता. त्यामुळे दोन्हा पक्षांतील मतभेद विकोपाला गेले होते.
First Published: Saturday, June 9, 2012, 13:51