Last Updated: Tuesday, June 12, 2012, 11:46
www.24taas.com, नवी दिल्ली केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचा काबूल दौरा रद्द झालाय. १४ जूनला प्रणव मुखर्जी काबूलच्या दौ-यावर जाणार होते. मात्र, ऐनवेळी हा दौरा रद्द करण्यात आलाय.
सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रणव मुखर्जी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. येत्या ४ दिवसांत काँग्रेसकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचं नाव सोनिया गांधी जाहीर करण्याची शक्यता आहे. मुलायमसिंह यादव, ममता बॅनर्जी आणि मायावती या तिघांच्या पाठिंब्याशिवाय युपीएचा राष्ट्रपती होणं कठीण आहे.
बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काँग्रेसला बरीच कसरत करावी लागणार आहे. यापैकी एका जरी घटकानं माघार घेतली तरी काँग्रेसचा गेमप्लॅन बिघडू शकतो. या पार्श्वभूमीवर प्रणव मुखर्जी यांचा काबूल दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
.
First Published: Tuesday, June 12, 2012, 11:46