'नित्यआनंद' घेणारे 'स्वामी नित्यानंद' अटकेत? - Marathi News 24taas.com

'नित्यआनंद' घेणारे 'स्वामी नित्यानंद' अटकेत?

www.24taas.com, बंगळुरू
 
विवादात अ़़डकलेले स्वामी नित्यानंद यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. तर स्वामी नित्यानंदांना लवकरच अटकही केली जाऊ शकते. पोलिसांनी नित्यानंद यांच्या आश्रमाला चारही बाजूंनी पहारा दिला आहे. त्यामुळे नित्यांनदवर अटकेची लटकती तलवार असल्याने तेथील आश्रम कर्मचारीही आश्रम सोडताना दिसत आहेत.
 
तसचे नित्यानंदाचा अटकेआधी पोलीस अनेक ठिकाणी छापे मारत आहेत. तर आश्रमच्या वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे की, स्वामी नित्यानंद लवकरच समोर येतील. मुख्यमंत्री डीवी सदानंद गौडा यांनी म्हटलं आहे की,
 
एका तमिळ टीव्ही चॅनलवर नित्यानंद स्वामी आणि एक अभिनेत्री हे 'नको त्या अवस्थेत' दाखवण्यात आले होते. त्य़ामुळे 2010 मध्ये नित्यानंद स्वामी गायब झाले होते. कर्नाटक पोलिसांनी हिमाचल प्रदेशातून अटक केली होती.
 
 
 
 
 
 
 

First Published: Tuesday, June 12, 2012, 13:37


comments powered by Disqus