Last Updated: Tuesday, June 12, 2012, 18:17
www.24taas.com, नवी दिल्ली काळा पैसा देशात आणण्यासाठी योगगुरू रामदेव बाबा यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांचीही त्यांनी भेट घेतली आणि मुलायम यांनी काळ्या पैशाविरोधातल्या आंदोलनाला समर्थन दिल्याची माहिती बाबा रामदेवांनी दिलीय.
मुलायमसिंग यादव यांच्या घरीच बाबांनी त्यांची भेट घेतली. अगदी सुरुवातीपासूनच मुलायम सिंग यादवांच्या आपल्या मुदद्याला पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. तर काळा पैसा देशात परत आणण्याची गरज असल्याचं सांगत बाबा रामदेवांच्या आंदोलनाला सपाचा पाठिंबा असल्याचं मुलायम सिंग यादवांनीही सांगितलं.
काळ्या पैशांच्या मुद्द्यावर सध्या योगगुरू बाबा रामदेव विविध पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. उद्या आपण बिजू जनता दलाचे नविन पटनायक यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
First Published: Tuesday, June 12, 2012, 18:17