नरेंद्र मोदी म्हणजे रावण- दिग्विजय सिंग - Marathi News 24taas.com

नरेंद्र मोदी म्हणजे रावण- दिग्विजय सिंग

www.24taas.com, अहमदाबाद
 
भाजपा पक्षातून राजीनामा दिलेल्या संजय जोशींचं सांत्वन करून झाल्यावर वरिष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले आहे. दिग्विजय सिंग यांनी मोदींची तुलना रावणाशी केली आहे.
 
नरेंद्र मोदी म्हणजे रावण आहेत असं दिग्विजय सिंग यांचं म्हणणं आहे. विकास पुरूष मानल्या गेलेल्या नरेंद्र मोदींबद्दल दिग्विजय सिंग म्हणाले, “रामायण वाचलं तर लक्षात येईल, की रावणानेही आपल्या राज्यात अनेक विकासकामं केली होती. त्याच्या काळात लंका सोन्याची त्याने सोन्याची बनवली होती. पण, त्याचा उपयोग काय झाला? शेवटी रावणाला त्याच्या अहंकाराने आणि हट्टीपणानेच मृत्यूचा मार्ग दाखवला. मोदींच्या बाबतीही असंच काहीसं घडणार आहे”
 
“नरेंद्र मोदींनी गर्व आणि अहंकार बाजूला ठेऊन नीट पाहिलं तर त्यांना वास्तव काय आहे ते कळेल” असा सल्लाही मोदींना दिग्विजय सिंग यांनी दिला आहे. पंतप्रधान कार्यालयाने अण्णा हजारेंना देशद्रोही म्हटल्याबद्दल दिग्विजय सिंग यांना विचारलं असता दिग्विजय सिंग म्हणाले, “मी ते पत्र पाहिलं आहे. त्य़ात कुठेही गांधीवाद्याला देशद्रोही म्हटलेलं नाही.”

First Published: Wednesday, June 13, 2012, 16:27


comments powered by Disqus