Last Updated: Wednesday, June 13, 2012, 18:48
www.24taas.com, बंगळुरू केंद्रीय चौकशी आयोगानं म्हणजेच सीबीआयच्या एका कोर्टानं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय. येडियुरप्पांसोबतच त्यांच्या अवैध उत्खनन घोटाळ्यातील इतर नातेवाईकांचा अटकपूर्व जामीन अर्जही सीबीआयनं फेटाळलाय. त्यामुळे आता पुन्हा एकदा येडियुरप्पा यांना अटक होणार का? आणि होणार तर ती कधी? याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल.
सीबीआयकडून अवैध उत्खनन घोटाळ्यात येडियुरप्पा आणि त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांच्या नावांचा उल्लेख झाल्यानंतर त्यांना कधीही अटक होण्याची भीती सतावू लागली होती. त्यातून सुटका मिळवण्यासाठी आरोपींनी कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मागच्या आठवड्यात कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवला होता. येडियुरप्पांसहित त्यांचा मुलगा बी. वाय. राघवेंद्र आणि बिवाई विजयेंद्र तसचं जावई आर. एन. सोहन कुमार यांच्या अटकपूर्व जामीनावर न्यायाधीश डी. आर. वेंकट सुदर्शन यांनी हा निर्णय राखून ठेवला होता.
आश्चर्य म्हणजे, सुप्रीम कोर्टानं ११ मे रोजी दिलेल्या आदेशानंतरच सीबीआयनं येडियुरप्पा आणि इतरांवर गुन्हे दाखल केले होते.
.
First Published: Wednesday, June 13, 2012, 18:48