Last Updated: Thursday, June 14, 2012, 00:07
www.24taa.com, नवी दिल्ली देश नेतृत्वाशिवाय काम करत असल्याची टीका प्रसिद्ध उद्योगपती आणि विप्रो उद्योग समूहाचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी केलीय. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे त्यांनी सरकावर क़डक शब्दांत ताशेरे ओढलेत.
देशाचा विकास दर 6 टक्के पाहिजे होता. तसंच 8 टक्के विकासदर असताना सरकारनं पाऊलं उचलायला हवी होती असंही प्रेमझी यांनी म्हटलंय... तर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनीही सरकारवर हल्लाबोल केलाय. गेल्या तीन ते चार महिन्यांत आतंरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा खराब झाल्याचं मूर्ती यांनी म्हटलंय. या परिस्थितमुळं भारतीय म्हणून दुःख वाटत असल्याची प्रतिक्रिया मूर्ती यांनी दिलीय.
आर्थिक सुधारणांची अमंलबजावणी होत नाही, त्या मागं घ्याव्या लागतात हे दुर्देव असल्याचं मूर्ती यांनी म्हटलंय... नियोजनाचा अभाव आणि यूपीए सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचं निरीक्षण या दोन्ही उद्योगपतींनी नोंदवलंय.. देश आर्थिक संकटाच्या छायेत असताना दोन आघाडीच्या उद्योगपतींनी व्यक्त केलेली ही मतं गांभीर्यानं घेण्याची गरज आहे.
First Published: Thursday, June 14, 2012, 00:07