Last Updated: Thursday, June 14, 2012, 10:58
www.24taas.com, नवी दिल्ली राष्ट्रपतीपदाच्या निवडीवरून दिल्लीत भेटीगाठींचे सत्र सुरु आहे. सरकारचे संकटमोचक ठरलेले प्रणव मुखर्जी दहा जनपथवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या भेटीला दाखल झालेत.
काँग्रेस सध्या केवळ प्रणव मुखर्जींच्या नावाचा विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. रात्री उशिरा प्रणव मुखर्जींनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी आणि अहमद पटेल यांची भेट घेतली.
पाच नावांचा चर्चा देशाचे नवे राष्ट्रपती कोण होणार? या चर्चेनं सध्या राजधानी दिल्लीतलं वातावरण ढवळून निघालंय. सोनियांचे विश्वासू सहकार म्हणून ओळखले जाणारे प्रणव मुखर्जी यांचं नाव यात सर्वाधिक आघाडीवर होतं. मात्र आता राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत तब्बल पाच नावांचा समावेश झाला आहे.
खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांच नावंही आता राष्ट्रपतीपदासाठी घेतलं जाऊ लागंलय. तर हमीद अन्सारी तसंच माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दूल कलाम यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होऊ लागलीये. अगदी सुरवातीला पहिल्यांदा ज्यांचं नाव घेतलं जात होत, ते सोमनाथ चटर्जीही पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आलेत. त्यामुळे राष्ट्रपतीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, यावरचा सस्पेन्स आता आणखीनच वाढलाय.
First Published: Thursday, June 14, 2012, 10:58