गुजरातमधील अपघात २४ ठार - Marathi News 24taas.com

गुजरातमधील अपघात २४ ठार

www.24taas.com, अहमदाबाद
 
सानंद-विरामगाम महामार्गावर आज गुरुवारी ट्रक अपघातात  आठ बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाला. अपघातातील १५ जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
 
रात्रभर कोसळलेल्या पावसाने निसरड्या झालेल्या रस्त्यामुळे आज सकाळी टारोडी गावाजवळ ट्रक उलटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिठाच्या अवजड पोत्यांनी ट्रक प्रमाणापेक्षा जास्त भरला असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याचे वृत्त आहे. जखमींवर व्ही. एस. रुग्णालय आणि सानंद रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

First Published: Thursday, June 14, 2012, 15:03


comments powered by Disqus