Last Updated: Thursday, June 14, 2012, 17:10
www.24taas.com, श्रीनगर जम्मू काश्मिरमधील पुंछ जिल्ह्यातील सीमा नियंत्रण रेषेजवळ (LOC) पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय सेनेचा एक सैनिक शहीद झाला आहे. तर तर ३ सैनिक जखमी झाले आहेत.
भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सेनेने एलओसीजवळ कृष्णा घाटी सेक्टरजवळ भारतीय सेनेवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. यावेळी पहारा देत असणाऱ्य़ा भारतीय सैनिकांवर पाकिस्तानी सैनिकांनी लहान हत्यारांनी गोळीबार केला. यात एक भारतीय सैनिक जखमी झाला होता.
“ज्यावेळी भारतीय लष्कराचे काही सैनिक जखमी सैनिकाला सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यासाठी पुढे सरसावले, तेव्हा पाकिस्तानी लष्कराने गोळीबार वाढवला. गळ्यामध्ये गोळी लागल्यामुळे जखमी झालेला भारतीय सैनिक शहीद झाला. यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तरादाखल भारतीय सैनिकांनीही गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारामध्ये ३ भारतीय सैनिक जखमी झाले आहेत. त्यातील एका सैनिकाची प्रकृती गंभीर आहे.” अशी माहितीही लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली.
First Published: Thursday, June 14, 2012, 17:10