Last Updated: Thursday, June 14, 2012, 20:08
www.24taas.com, नवी दिल्ली केंद्रातील यूपीए सरकारमधून बाहेर पडणार नाही किंवा सरकार पाडणार नाही, असे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रपती निवडणुकीबाबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्याशी भेट करण्यापूर्वी ममतांनी हे स्पष्ट केले आहे.
मी सरकार पडण्याचे कारण बनणार नाही, असे ममता यांनी सांगितले. विशेष म्हणजे राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी यूपीएची उद्या म्हणजे शुक्रवारी बैठक होणार आहे.
दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी चर्चेचे दरवाजे खुले असल्याचे आणि नाववर एकमत होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, स्वतः काँग्रेसला प्रणवदा राष्ट्रपती म्हणून मान्य नसल्याचा गौप्य स्फोटही यादव यांनी केला. त्यांना जर राष्ट्रपती बनवायचे असते तर त्यांनी केवळ त्यांचेच नाव पुढे केले असते. आम्ही कोणत्याही नाववर अडून बसलेलो नाही, ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा झाल्यावरच निर्णय घेण्यात येईल असे यादव यांनी सांगितले.
First Published: Thursday, June 14, 2012, 20:08