पेट्रोलच्या दरात घट होण्याची शक्यता - Marathi News 24taas.com

पेट्रोलच्या दरात घट होण्याची शक्यता

www.24taas.com, नवी दिल्ली


महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला थोडासा दिलासा मिळेल अशी एक बातमी आहे. आज नवी दिल्लीमध्ये तेल कंपन्यांनी एक बैठक आयोजित केलीय. या बैठकीत पेट्रोलच्या किंमतीत २ रुपयांपर्यंत घट करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचच लक्ष लागून आहे.


दिवसेंदिवस महागाईचा दर वाढतच चाललाय. एप्रिल महिन्यात ७.२३ टक्के असणारी महागाई मे मध्ये ७.५५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे महागाईची साडेसाती सामान्यांची पाठ सोडण्यास तयार नाही, हे तर स्पष्ट झालंय. मात्र, या महागाईत सामान्यांना महागाईमध्ये थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणखी दोन रुपयांनी स्वस्त होऊ शकतं. पेट्रोल आणि कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे तेल कंपन्यांना थोडासा दिलासा मिळालाय. त्यामुळे पेट्रोल २ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा तेल कंपन्यांच्या आज होणा-या बैठकीकडे लागलंय.

First Published: Friday, June 15, 2012, 09:08


comments powered by Disqus