कलाम म्हणतात, ‘विचार चांगला...’ - Marathi News 24taas.com

कलाम म्हणतात, ‘विचार चांगला...’

www.24taas.com, नवी दिल्ली 


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनीही आता रस दाखवला आहे. उमेदवारीबाबत आपल्या नावाचा  विचार चांगला आहे मात्र, आपण योग्य वेळी निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया कलाम यांनी दिलीय. आपण सर्व राजकीय पक्षांचा आदर करतो, असं राजकीय वक्तव्य करायलाही कलाम विसरले नाहीत.


.


दरम्यान, कलाम निवडणूक लढवणारच असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलाय. तसंच सर्व पक्षांनी कलांच्या उमेदवारीला समर्थन करण्याचं आवाहनही त्यांनी पत्रकार परिषदेत केलंय. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग आपल्या सोबतच असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केलाय. कलामांचे आपण निवडणुकीपूर्वी अभिनंदन करत असल्याचं सांगत त्यांच्या विजयाचा विश्वासही बॅनर्जी यांनी व्यक्त केलाय.

First Published: Friday, June 15, 2012, 12:44


comments powered by Disqus