Last Updated: Monday, June 18, 2012, 12:06
www.24taas.com, नवी दिल्ली रिझर्व बँकेनं तिमाही पतधोरण जाहीर केलं असून रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतीही कपात सुचवलेली नाही. त्यामुळं सर्वसामान्यांच्या कर्जाच्या व्याजदरात कोणताही कपात होणार नाही हे स्पष्ट झाल आहे.
रिझर्व बँकेनं पतधोरणाचा आढावा घेतला. यावेळी व्य़ाजदरात कपात होईल अशी शक्यता होती. मात्र ही शक्यता मावळलीये. देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर ५.३ टक्क्यांवर आलाय. अर्थव्यवस्था वाढीचा गेल्या नऊ वर्षातला हा निचांक आहे. त्यामुळं वाढीला चालना देण्यासाठी व्याजदरात कपात होण्याची शक्यता होती. मात्र रिझर्व बँकेनं रेपो रेट कमी न करण्याचं धोरण अवलंबलयं. त्यामुळं सर्वसामान्यांच्या कर्जांचे व्याज सध्यातरी जैसे थेच राहणार आहेत.
मंदावलेल्या भारतीय अर्थव्यस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व बँक व्य़ाजदरात कपात करण्याची शक्यता होती. त्याबाबत आज बँक पतधोरणाचा तिमाही आढावा घेण्यात आला. व्याज दरात कपात होण्याची शक्यता असल्याने शेअर बाजारावरही सकारात्मक परिणाम दिसून आला. सकाळच्या सत्रातच बाजारानं १७ हजार अंशांची पातळी ओलांडली. मात्र, हा भ्रम ठरला.
First Published: Monday, June 18, 2012, 12:06