संगमाना हवीय ठाकरेंची भेट - Marathi News 24taas.com

संगमाना हवीय ठाकरेंची भेट

www.24taas.com, नवी दिल्ली
 
ए. पी. जे. अब्दुल कलमांच्या नावावर शिवसेना आग्रही आहे, तर ममता बँनर्जीही कलमांसाठी आग्रही आहेत.पी. ए. संगमाच्या उमेदवारीला शिवसेना विरोध करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पी. ए. संगमा यांनी शिवसेनाप्रमुखांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. या भेटीसाठी संगमा मुंबईत येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
 
संगमा यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतलीय. डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम लढण्यास उत्सुक नसल्यानं तृणमूल काँग्रेसनं पाठिंबा द्यावा अशी विनंती केल्याचं संगमांनी सांगितलं. पी. ए. संगमाच्या उमेदवारीला शिवसेना विरोध करण्याची शक्यता आहे.  संगमा यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे भेटीसाठी वेळ मागितली आहे.
 
. मात्र मातोश्रीवरून अजून त्यांना भेटीसाठी वेळ देण्यात आलेली नाही. संगमा यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतलीय. डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम लढण्यास उत्सुक नसल्यानं तृणमूल काँग्रेसनं पाठिंबा द्यावा अशी विनंती केल्याचं संगमांनी सांगितलं.

First Published: Monday, June 18, 2012, 12:20


comments powered by Disqus