Last Updated: Tuesday, June 19, 2012, 17:06
www.24taas.com, हैद्राबाद 
वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांना जामीन मिळावा यासाठी शिथिलता दाखवल्याप्रकरणी सीबीआयचे एडिशनल स्पेशल जज टी.पट्टाभिरामाराव यांना अटक करण्यात आली आहे.
पट्टाभिरामाराव यांना याप्रकरणी निलंबित करण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वी पट्टाभिरामाराव यांचा मुलगा रविचंद्रा यालाही अटक करण्यात आली होती. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी जगनमोहन यांना सीबीआयनं अटक केली होती.
मात्र त्यानंतर सीबीआयच्या विशेष कोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता. मात्र हा जामीन मिळावा म्हणून टी.पट्टाभिरामाराव यांनी शिथिलता दाखवल्याच्या आरोप झाला होता.
First Published: Tuesday, June 19, 2012, 17:06