संगमांचा स्वाभिमान दुखावला, राष्ट्रवादीचा राजीनामा - Marathi News 24taas.com

संगमांचा स्वाभिमान दुखावला, राष्ट्रवादीचा राजीनामा

www.24taas.com, नवी दिल्ली
 
पी. ए. संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते निवडणूक लढवत असल्यानं एनडीए त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
जयललिता आणि नवीन पटनायक यांनी आधीच संगमा पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीने पी ए संगमा यांचा वेळोवेळी अपमान केला आणि यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला आहे, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. यासंदर्भात संगमा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
 
शरद पवारांनी म्हटलं होतं की, संगमांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू नये मात्र त्यानंतरही संगमा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा पक्षाने दिला होता.
 
 
 
 

First Published: Wednesday, June 20, 2012, 16:10


comments powered by Disqus