'अधिकाऱ्या'चा ४० महिलांवर बलात्कार, पैसे उकळले - Marathi News 24taas.com

'अधिकाऱ्या'चा ४० महिलांवर बलात्कार, पैसे उकळले

www.24taas.com, नवी दिल्ली
 
दिल्ली पोलिसांनी मुंबईतल्या अशा व्यक्तीला अटक केली आहे.. कि जी सीबीआय आणि इतर विभागतील महिला पोलिसांनाकडून केवळ पैसेच घेत नव्हता तर त्यांच्यावर बलात्कारही करायचा, आणि हे एक दोन महिलांसोबत नाही तर तब्बल ४० महिलांसोबत त्याचं असं वागणं सुरू होतं.
 
मुंबईतून अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याची पोलीस कोठडी मागून घेतली आहे. त्याच्याकडे चौकशीदरम्यान अनेक अशा गोष्टी समोर आल्या आहेत. ज्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर जवळजवळ ४ महिन्यानंतर त्याला पकडण्यात यश आलं आहे. महिलांना फोन करून त्यांच्या भावाबद्दल खोटी केस दाखल करू अस ं म्हणून त्यांच्याकडून पैसे उकळायाचा.
 
पोलिसांनी वाशी सेक्टर - २ मधून त्याला अटक केली. अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यात त्याने आपला गुन्हा कबूल केला. तो सीबीआय अधिकारी, एमटीएनलाचा अधिकारी, पोलीस अधिकारी असल्याचं सांगून ओळखीच्या महिलांना फोन करून त्यांच्याकडून पैसे उकळत असे. कि त्यांचे पती किंवा भाऊ यांच्याबाबत केस दाखल करण्यात आली आहे. आणि त्याच महिलांना बोलावून त्यांच्यावर बलात्कार करीत असे.
 
 
 
 
 
 

First Published: Wednesday, June 20, 2012, 17:48


comments powered by Disqus